राधा-कृष्णाचं  300 वर्ष प्राचीन मंदिर

हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे  'श्रीकृष्ण जन्माष्टमी'.

कृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते जन्माष्टमी.

यंदा ०६ सप्टेंबर रोजी आहे  श्रीकृष्ण जयंती.

या दिवशी कान्हाच्या विविध मंदिरांमध्ये भाविक घेतात दर्शन.

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये आहे राधा-कृष्णाचं 300 वर्ष प्राचीन मंदिर.

मंदिरात आहे राधा-कृष्णाची एक सुंदर मूर्ती.  इथे जन्माष्टमी मोठ्या उत्साहात होते साजरी.  शेकडो भाविकांची असते मांदियाळी.

जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता जन्मोत्सवाला होते सुरुवात. राधा-कृष्णाला सजवलं जातं सुंदर.

जन्मोत्सवानंतर केली जाते आरती आणि होतं प्रसादवाटप. विविध कार्यक्रमांचं असतं आयोजन.

फिरोजाबादच्या एका महिलेने पूर्ण संपत्ती दान करून केलं होतं मंदिर स्थापन, असं म्हणतात.