शेतीत छोटासा बदल अन् लाखोंची कमाई

शेतीत छोटासा बदल अन् लाखोंची कमाई

मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वाटचाल करत आहेत. 

अवर्षणग्रस्त असणाऱ्या बीड जिल्ह्यात आता फळबागांची शेती केली जात आहे. 

सुशी येथील शेतकरी कामरान शेख यांनी आधुनिक पद्धतीने सीताफळाची लागवड केलीय. 

चक्क पावसाळ्यात सीताफळ पिकवत त्यांनी 5 लाखांचे उत्पन्न घेतले आहे. 

कामरान यांना वडिलार्जित 9 एकर शेती असून ते पारंपारिक शेती करत होते. 

जिल्हा परिषद शिक्षक असणाऱ्या कामरान यांनी शेतीत प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. 

2020 मध्ये शेख यांनी साडेतीन एकर क्षेत्रावर 1100 सीताफळाच्या रोपांची लागवड केली. 

शेख यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत खत आणि छाटणीचे योग्य व्यवस्थापन केले. 

त्यामुळे सीताफळ ऐन पावसाळ्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यातच तोडणीला आले.

जवळपास दोन टन सीताफळाची तोडणी झाली असून खर्च जाऊन साडेतीन लाख नफा मिळालाय. 

एका शिक्षिकेनं बदलली परिस्थिती