आठवी पास तरुणाची 'या' व्यवसायातून लाखोंची कमाई 

कोणताही व्यवसाय असो मन लावून मेहनत केली आणि काटेकोर नियोजन केलं तर त्यामध्ये नक्की यश मिळतं.

जालना जिल्ह्यातल्या चितळी पुतळेमधला रहिवाशी असलेल्या गंगाधर कुबरे या तरुणानानं हे सिद्ध केलंय.

फक्त आठवी पास असलेल्या गंगाधरनं दुग्ध व्यवसायातून वर्षाला चार ते पाच लाखांचा नफा मिळवलाय.

गंगाधर यांनी मुंबईत अनेक वर्ष गॅरेज चालवले.

घरातली शेती असल्यानं त्यामधून उत्पन्न मिळवण्याचं त्यांनी ठरवलं.

त्यासाठी दुग्धव्यवसायाची निवड केली. मागच्या वर्षी पंजाबमधून पाच गायींची खरेदी केली.

त्यांच्या गोठ्यासाठी शेतामध्येच शेड उभारले.

गायींचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मुक्त संचार पद्धतीने गोठ्याची आखणी केली.

सध्या त्यांच्या व्यवसायातून त्यांना महिन्याला 50 ते 60 हजाराचे उत्पन्न मिळते.

तर वर्षाकाठी चार ते पाच लाख सहज मिळतात.

शेळीमुळे बदललं नशीब, होतेय लाखोंची कमाई