गायिका आशा भोसले    Unseen photo 

आशा ताईंचा जन्म 8 सप्टेंबर 1933 साली महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यात झाला. त्यांचं खरं नाव आशा मंगेशकर.

वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांनी सांगितिक दुनियेत पाऊल ठेवलं. 1943साली ‘चला चला नव बाळा’ हे त्यांनी गायलेलं पहिलं मराठी गाणं होतं.

आशा भोसले आणि लता दीदींनी गाण्यात करिअर करून आपल्या कुटुंबाला सावरलं. 

 आशा ताईंनी वयाच्या 16 व्या वर्षी 1949 मध्ये 'रात की रानी' सिनेमासाठी पहिलं गाणं गायलं होतं. 

मोहम्मद रफी यांच्याबरोबर गायलेल्या 'नन्हे मुन्हे बच्चे' या गाण्यानंतर आशा ताईंना खूप प्रसिद्धी मिळाली. 

 रफी मोहम्मद, आरडी बर्मन, सचिन देव बर्मन इ. अनेक प्रसिद्ध संगितकारांबरोबर आशा ताईंनी काम केलं. 

आशा ताई खूप चांगल्या कूक आहेत. दुबई, कुवेत, अबू धाबी, दोहा आणि बहरीनमध्ये त्यांचे रेस्टॉरंट देखील आहेत.

आई ताईंनी 'माई' या मराठी सिनेमातही काम केलं होतं. त्याचं वय तेव्हा 79 वर्ष होतं.  

आशा ताईंनी आतापर्यंत 15 भाषांमध्ये 12 हजारांहून अधिक गाणी  गायली आहेत.

त्यांना 2000 साली दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यानंतर 2008 साली पद्मभूषण पुरस्कार देखील देण्यात आलाय .