हे आहे देशातील सर्वात स्वस्त फुटवेअर मार्केट

हे आहे देशातील सर्वात स्वस्त फुटवेअर मार्केट

इंदूर शहर हे आपल्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे.

यामुळेच या शहराला मिनी मुंबईसुद्धा म्हटले जाते.

याठिकाणी असा एक परिसर आहे, नर्मदा नगर, जे आपल्या जोड्यांच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे.

ज्याठिकाणी चपलांची किंमत 50 रुपये आणि जोड्यांची किंमत 200 रुपयांपासून सुरू होते.

या मार्केटला जोडे खरेदीसाठी बेस्ट चॉईस मानले जाते.

येथील दर हे इतर अन्य शोरुम आणि मोठ्या दुकानांच्या तुलनेत खूपच कमी आहेत.

यामुळेच शहरातील लोक याठिकाणी येतात आणि शॉपिंग करतात.

येथे लग्नाच्या सीजनमध्ये वापरली जाणारी वधूची विशेष अशी फॅन्सी लाल सँडल मिळते.

या सर्वांवर हेवी वर्क केले जाते, जे खूपच सुंदर आणि रॉयल दिसते.