BEST बसचा 150 वर्षांचा इतिहास उलगडणारं संग्रहालय!

सामान्य मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाचं महत्त्वाचं माध्यम म्हणजे बेस्ट.

काळ्या-पिवळ्या टॅक्सी, रिक्षा या सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधांसोबतच बेस्टच्या बसनं रोज लाखो मुंबईकर प्रवास करतात.

एखादा दिवस ही सेवा बंद असेल तर मुंबईकरांचं वेळापत्रकच कोलमडून जातं.

मुंबईतल्या  बेस्ट बसला तब्बल दीडशे वर्षांचा इतिहास आहे.

हा सर्व इतिहास अनुभवण्याची, समजून घेण्याची संधी मुंबईकरांना एका खास संग्रहालयात मिळते.

सायनमधील आणिक आगारात बेस्टचे वस्तू संग्रहालय आहे.

मुंबईतील स्थानिक प्रवासी वाहतूक व विद्युत पुरवठा या दोन महत्त्वाच्या सेवांबाबत अनेक पुरातन वस्तू या ठिकाणी आहेत.

माहिती, दस्तऐवज, चल प्रतिकृती, स्थिर प्रतिकृती, छायाचित्रे यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात.

कोकणातील अधिकाऱ्यानं वर्ध्यात उभारलं शिवमंदिर