VIDEO: हृताचा नवऱ्यासोबत झक्कास डान्स!

हृता दुर्गुळे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

तिने आपल्या अभिनयानं आणि मोहक रूपानं चाहत्यांचं मन जिंकलं आहे.

हृता अभिनयासोबतच उत्तम डान्स देखील करते.

तिच्या नृत्यावर चाहते फिदा आहेतच पण त्यासोबत तिचा नवरा देखील खूप छान डान्स करतो.

हृताने अनेकदा तिचा आणि प्रतीक शाहचा डान्स व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

नुकतंच हृताचा वाढदिवस झाला, तिने नवऱ्यासोबत बर्थडे साजरा केला.

सोबतच तिने दोघांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडिओत हृता आणि प्रतीक हे दोघे 'चलेया' या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

दोघांचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.