ब्रँडेड शूजची करा स्वस्तात खरेदी

ब्रँडेड शूजची करा स्वस्तात खरेदी

सध्याच्या काळात रोज बाहेर पडताना बुट घालणे ही फक्त स्टाईल नाही तर गरज बनलीय. 

ऑफिस, ट्रेक, लग्नसमारंभ, थंडीपासून बचाव, खेळ यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बुट आपल्याला लागतात.

ट्रेंडिंग आणि स्टायलिश बुट हवे असतील तर मुंबईतील एका खास जागेची माहिती हवीच.

मध्य मुंबईतील कुर्ला स्टेशनच्याबरोबर समोर बुट आणि चप्पलचे होलसेल मार्केट आहे.

या मार्केटमध्ये इतर रिटेल मार्केटपेक्षा 30 ते 40 टक्के कमी किमतीमध्ये शूज मिळतात.  

कुर्ला भागात असणाऱ्या या मार्केटच्या नावानेच हा परिसर ओळखला जातो. 

मुंबईकरांसोबतच परदेशी पर्यटकांसाठी देखील हे मार्केट मुख्य शॉपिंग स्पॉट बनलंय.

या बाजारात 30 - 40 दुकानं असून इथं तुम्हाला प्रत्येक ब्रँडचे बुट मिळतात. 

साधारण 200 रुपयांपासून ते 1 लाखापर्यंतचे शूज या मार्केटमध्ये मिळतात.