दूध न फाटता बनवा  'गुळाचा चहा', वापरा  सोपी पद्धत

गुळाचा चहा हा साखरेच्या चहापेक्षा अधिक चविष्ट लागत असल्याने सध्या त्याची लोकप्रियता वाढू लागली आहे.

गुळाचा चहा हा आरोग्यासाठी देखील चांगला असतो.

गुळाचा चहा पिल्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो असे आयुर्वेदतज्ञांचे मत आहे.

एका भांड्यात एक कप पाणी घालून त्यात दोन लहान गुळाचे खडे टाका आणि त्या पाण्याला थोडी उकळी काढा.

मग एक चमचा बडीशेप, अर्धा चमचा सुंठ पावडर, वेलची इत्यादी मसाले त्यात टाका.

उकळत्या पाण्यात मसाल्यांसह एका व्यक्तीचा चहा बनवण्यासाठी 1 लहान चमचे साखर टाका.

मग गुळाचे खडे पाण्यात नीट विरघळे पर्यंत मंद आचेवर चहा उकळून घ्या.

काहीवेळाने उकळणाऱ्या चहामध्ये दूध टाका.

चहा तयार झाल्यानंतर तो नीट गाळून घ्या आणि सर्व्ह करा.