जोडीदारात 'हे' गुण असतील तर त्याला अजिबात सोडू नका!

एकरुप होतात दोघे.. प्रेमात एकमेकांशी अध्यात्मिक नातं जोडलं जातं. यानंतर दोघेही एकरुप होतात. त्यांना आपण वेगळे आहोत असं वाटत नाही.

कायम हवी असते साथ.. प्रेमात पडल्यानंतर कायम जोडीदाराची साथ सोबत हवीहवीशी वाटते. जोडीदारासोबत असताना कायम सुरक्षित वाटते.

चांगल्या जोडीदार कसा असतो? प्रेमाचं नातं हे शब्दांच्या पलिकडचं असतं. या नात्यात एकमेकांना समजून घेण्यासाठी केवळ भावनाच पुरेशा असतात.

एकमेकांचा आदर.. कोणत्याही नात्यात एकमेकांचा आदर असेल तर त्यात प्रेम आणि समजूतदारपणा जास्त असतो. चांगल्या नात्यात दोन लोक एकमेकांच्या मर्यादांचा सन्मान करतात.

निरपेक्ष प्रेम.. चांगला जोडीदार तुमच्या आजूबाजूला काहीही होत असेल तरी तो तुम्हाला त्याची चाहूल न लागू देता सहज तुमचं रक्षण करतो किंवा नकळतपणे तुम्हाला संकटापासून दूर नेतो. 

दिलखुलासपणा.. चांगला जोडीदार कायम मनमोकळेपणाने आणि मनातील सर्व गोष्टी बिनधास्त बोलतो. तसेच तुम्ही बोलत असताना तो तुमचं पूर्ण म्हणणं ऐकूण घेतो आणि त्यानंतर त्याचे मत मंडतो. 

तुमच्या अस्तित्वाची जाणीव.. चांगला जोडीदार तुम्हाला कधीही कमी लेखत नाही. उलट तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव ठेवतो, तुमचा आदर करतो आणि तुम्हाला पुढे जाण्यास प्रोत्साहन देतो.

खरं बोलणेही महत्त्वाचे.. चांगला जोडीदार असेल तर तो तुम्हाला तुमची चूक बिनधास्तपणे सांगतो आणि त्यात दुरुस्ती करण्याचा सल्ला देतो. 

काय हवं, काय नाही.. चांगला जोडीदार काय तुमच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून तुम्हाला काय हवं काय नाही हे लक्षात ठेवतो. तो तुम्हाला खूश ठेवण्यासाठी अप्रत्यक्ष प्रयत्न करत असतो.