केळीच्या पानावर जेवण्याच फायदे!

आपण केळीच्या पानावरील अन्न खातो तेव्हा ते केवळ सुंदरच दिसत नाही, तर आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर बनते. 

दक्षिण भारतीय घरांमध्ये केळीच्या पानांवर जेवण्याची परंपरा आहे. हिंदू घरांमध्येही सणाच्या दिवशी केळीच्या पानांचा वापर केला जातो. 

एका संशोधनानुसार जेवणासाठी कागद, प्लास्टिक किंवा स्टीलच्या ताटांपेक्षा केळीच्या पानांचा वापर खूप फायदेशीर असतो. 

केळीच्या पानांवर जेवल्याने शरीराला त्यातील पॉलीफेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट मिळते, त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

केळीच्या पानावर जेवल्याने फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते. यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म अन्नातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात.

केळीच्या पानांवर अन्न खाणे हा सर्वात स्वस्त पर्याय आहे. यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची गरज नाही.

भांडी अनेकदा धुतल्यानंतरही त्यावर साबण अडकून राहतो. परंतु केळीच्या पानावर मेणासारखा लेप असतो, त्यामुळे धूळ किंवा कोणत्याही प्रकारची घाण पानावर चिकटत नाही. 

केळीच्या पानांवर मेणाचा पातळ थर असतो, त्याची चव खूप चांगली असते. केळीच्या पानांवर गरम जेवण दिल्यास जेवणाची चव आणखी वाढते.

प्लास्टिकच्या ताटात जेवल्याने कर्करोगासारखे आजार होऊ शकतात. तर केळीची पानांवर जेवल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.