चक्क सोन्या-चांदीच्या मोदकाचा बाप्पाला नैवद्य!

गणपती बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक.

त्यामुळे गणेशोत्सवात ‘मोदक’ सगळ्यांच्याच घरी पाहायला मिळतात.

बाप्पाला आपण दरवर्षी वेगवेगळे मोदक दाखवत असतो.

पण या वर्षी बाप्पासाठी मोदकांची काही वेगळीच मेजवानी असणार आहे.

पुणेकरांना आता सोने-चांदीचा अर्क असलेले मोदक आपल्या बाप्पा चरणी अर्पण करता येणार आहेत.

पुण्यातील चितळे बंधू यांच्याकडे प्रथमच हे मोदक पाहिला मिळत आहे.

सोन्याचं अर्क लावलेलं मोदक 3680 रुपये किलो आहेत तर चांदीचा अर्क लावलेलं मोदक 1280 रुपये किलो आहेत.

बाप्पाच्या नैवेद्याची काळजी नको, पुण्यात 'या' ठिकाणी एका दिवसात तयार होतात 1 लाख मोदक!