एकाच वाहिनीवर झळकतायत या सख्ख्या बहिणी!

मराठी सिनेसृष्टीत सख्ख्या बहिणींच्या जोड्या प्रसिद्ध आहेत.

यात खुशबू तावडे आणि तितिक्षा तावडे या बहिणींची जोडी लोकप्रिय आहे. 

या दोघी अनेक वर्ष झाले चित्ररपटसृष्टीत कार्यरत आहेत. 

खुशबू आणि तितिक्षाची खासियत म्हणजे दोघी पहिल्यांदाच एकाच वाहिनीवर झळकत आहेत. 

खुशबू आणि तितिक्षा सध्या झी मराठीवरील वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करत आहेत. 

तितिक्षा तावडे सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत नेत्राच्या भूमिकेत दिसत आहे. 

तर खुशबू तावडे झी मराठीच्याच सारं काही तिच्याचसाठी' या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे. 

खुशबू आणि तितिक्षाचं एकमेकींवर नितांत प्रेम आहे. 

या दोघीही एकमेकींच्या सख्खा बहिणी असल्या तरीही त्या कायमच मैत्रिणीसारख्या राहतात.