हौशी कलाकारांसाठी हक्काचं कलादालन!

माणसाकडे कला असली की तो  जगातील श्रीमंत माणूस आहे असे म्हंटले जाते.

आयुष्यात आनंद, समाधान, विरंगुळा देण्याचं काम कला करते.

अनेक कलाकारांना योग्य प्रोत्साहन मिळणे आवश्यक असते.

याच हौशी कलाकारांच्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळावं म्हणून डोंबिवलीत नवरे प्लाझा येथे कलादालन तयार करण्यात आलंय.

या कलादालनात लाईटचे दिवे, लाकडापासून तयार केलेले ऍम्प्लिफायर, नारळाच्या करवंटीपासून तयार केलेल्या वस्तू आहेत.

डोंबिवलीकर रमेश दाते गेल्या 40 वर्षापासून करवंटी आणि लाकडापासून वस्तू बनवतात.

यासंदर्भात अनेक प्रदर्शन देखील त्यांनी भरवली आहेत.

वेगवेगळे पक्षी, प्राणी , स्वयंपाक खोलीत लागणाऱ्या काही वस्तू त्यांनी कलाकृतीतून साकारल्या आहेत.

अशी माहिती कलाकार आशिष नवरे यांनी दिली.

3 मित्रांनी दीड महिने काम करुन उभा केला मांढरदेवीचा देखावा, Video