लसूण झटपट सोलण्यासाठी वापरा या 7 टीप्स!

स्वयंपाक करताना लसूण सोलणे हे अतिशय कंटाळवाने काम असते. परंतु काही टीप्स फॉलो करून तुम्ही झटपट लसून सोलू शकता.

बेलणं वापरून तुम्ही सहज लसूण सोलू शकता. यासाठी लसणाच्या पाकळ्यांवर 3-4 वेळा फिरवा. यामुळे लसणाची साल सहज निघून जाईल.

गरम पाणी वापरून देखील तुम्ही लसूण सोलू शकता. यासाठी लसणाच्या पाकळ्या 3 मिनिटापर्यंत गरम पाण्यात टाका. यानंतर जास्त मेहनत करावी लागणार नाही.

चाकू वापरूनही तुम्ही लसूण सोलू शकता. यासाठी लसणाच्या पाकळ्यांची वरील बाजू चाकून कापून घ्या आणि नंतर ती सोलून घ्या. 

लसणाच्या पाकळ्या सोलण्यासाठी त्याच्या पाकळ्या एका कपड्यात ठेवा आणि त्या जड वस्तूने कुटून घ्या. यामुळे त्याची साल मोकळी होते. 

लसणाछ्या पाकळा काढून त्या मायक्रोव्हेवमध्ये 30 सेंकद ठेवा. यामुळे तुम्हाला सहज लसून सोलता येईल. 

तव्यावर काही वेळ लसूण भाजून घेतला, तरी देखील तुम्ही तो सहज सोलू शकता.

याशिवाय एका डब्यात लसणाच्या पाकळ्या टाका. 

डब्याचे झाकण बंद करून डब्बा जोराने हलवा. यामुळे लसणाच्या पाकळ्यांची साल सैल होईल.