रात्री अजिबात खाऊ नका ही पाच फळं!

फळं खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. फळं खाल्ल्याने शरीराची अनेक आजारांपासून सुरक्षा होते. परंतु रात्री काही फळं खाल्ल्याने आरोग्याचं गंभीर नुकसान होऊ शकतं.

फळे खाण्याची सर्वोत्तम वेळ ही न्याहारी नंतर आणि जेवण करण्यापूर्वी किंवा नंतर आहे असे म्हटले जाते.

बरेच लोक रात्री फळे खातात. रात्रीच्या वेळी फळं खाल्ल्याने शरीराला गंभीर नुकसान होऊ शकते.

रात्री फळं खाल्ल्याने आरोग्यासंबंधीत गॅस, अॅसिडिटी, झोपेची समस्या अशा अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. 

रात्री सफरचंद खाणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. सफरचंदात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने गॅस आणि अॅसिडिटीची समस्या उद्भवते.

व्हिटॅमिन-सीयुक्त संत्री खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचेचे संरक्षण होते. परंतु ते रात्री झोपण्यापूर्वी खाल्ल्यास छातीत जळजळ होऊ शकते.

रात्रीच्या वेळी पेरू खाणे टाळावे. पेरूमध्येही फायबरचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे पचनावर परिणाम होतो आणि अॅसिडीटी, पोटफुगीच्या समस्यांना होतात. 

अननस हे आरोग्यासाठी नक्कीच चांगले आहे, पण रात्री खाऊ नये. अननस हे आम्लयुक्त फळ आहे, ज्यामुळे छातीत जळजळ, पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. 

केळी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. परंतु तज्ञ रात्री केळी न खाण्याचा सल्ला देतात. कारण केळीमध्ये कॅलरीज जास्त असतात आणि ते रात्रभर पचत नाही.