या जमातीचे लोक अंघोळ करत नाहीत

 एक जमात आहे ज्याठिकाणी अंघोळीला बंदी आहे. हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल मात्र ही गोष्ट खरी आहे. 

 ही जमात कोणती आहे आणि याठिकाणची जीवशैली कशी आहे याविषयी जाणून घेऊया.

या जमातीचं नाव हिंबा आहे. या जमातीचे 50,000 लोक असून या जमातीत अंघोळ करण्यास सक्त मनाई आहे.

नामिबियामध्ये ही जमात असून येथे अनेक पर्यकही पर्यटनासाठी येतात.  

हिंबा जमातीच्या लोकांचे स्वतःचे नियम आणि कायदे आहेत.

हे लोक पाण्याने अंघोळ करत नाहीत. याऐवजी ते धुराने अंघोळ करतात. याला स्मोक बाथिंग म्हणतात.

या जमातीचे लोक आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांची सेवा घरातील महिलांकडून करुन घेतात.

घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी एक वेगळी खोली असते ज्यामध्ये त्यांच्या पाहुणचार महिला करतात.

हिंबा लोक मुख्यतः शेती आणि पशुपालन करतात. येथे सर्व निर्णय घरातील पुरुष घेतात.