जर्मनीत दिसली गणेशोत्सवाची धूम

जर्मनीत दिसली गणेशोत्सवाची धूम

देश सोडून दुसऱ्या देशात गेले तरी भारतीय लोक प्रथा परंपरा विसरत नाहीत. 

महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम असतानाच जगभरातील मराठी बांधवही हा उत्सव साजरा करतात. 

जर्मनीतील मराठी बांधवांनी मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला. 

डूसल्डॉर्फ या शहरात मराठी मित्र मंडळातर्फे बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

तसेच ढोल ताशांच्या गजरात गणरायाची जंगी विसर्जन मिरवणूकही काढण्यात आली. 

यावेळी पारंपरिक मराठी संगीत ढोल ताशा, नृत्य आणि साहसी खेळांनी सर्वांचं लक्ष वेधलं. 

लेझिम, मल्लखांबाचे प्रयोग पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. 

विसर्जन मिरवणुकीत पुण्यातील प्रसिद्ध रमणबाग ढोल ताशा पथकाने रंगत आणली.

दर्ग्यातून येतोय बाप्पाच्या आरतीचा आवाज