घरातील गरीबी होईल दूर! फक्त 6 ऑक्टोबरपूर्वी करा हे काम

तुम्ही जर गरीबीने त्रस्त असाल आणि खूप मेहनत करून देखील तुमच्या आर्थिक समस्या संपत नसतील तर येत्या 6 ऑक्टोबरपूर्वी शुभ दिवशी श्री सूक्तम पठण करून तुम्ही देवी लक्ष्मीचा आशिर्वाद मिळवू शकता.

महालक्ष्मी व्रतात देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते. या शुभ दिवसांमध्ये एक विशेष कार्य केल्यास देवी लक्ष्मी 7 जन्माची गरीबी दूर करते अशी मान्यता आहे.

श्री सूक्तम पाठ : हिंदू धर्मात धन प्राप्तीसाठी देवी लक्ष्मीची प्रामुख्याने पूजा केली जाते. काही लोक कुबेर आणि सूर्य देवाची देखील पूजा करतात. 

काही लोक धान धर्म करतात, तर काही लोक रत्नही धारण करतात. परंतु श्री सूक्तम पाठ यासर्वांपेक्षा जास्त शुभ मानला जातो.

काय आहे श्री सूक्तम? : श्री सूक्तम देवी लक्ष्मीची आराधना करण्यासाठी त्यांना समर्पित मंत्रोच्चार आहे. याला लक्ष्मी सूक्तम् देखील म्हटले जाते. हे सूक्त ऋग्वेदातून घेतले आहे.

देवी लक्ष्मीचे आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री सूक्तम पठण केले जाते. श्री सूक्तममध्ये 15 ऋचा आणि महात्म्यासह 16 ऋचा आहेत. परंतु यासाठी नियमांचं पालन करणं अतिशय आवश्यक असतं. तरच तुम्हाला याचा संपूर्ण लाभ मिळू शकतो.

कसे कराल पठण? : देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा. तिच्यासमोर तूपाचा दिवा लावा आणि श्री सूक्तम पठण करा. प्रत्येक श्लोकानंतर देवी लक्ष्मीला फूल आणि अत्तर अर्पण करा. पठण झाल्यानंतर देवीची आरती करा. देवी लक्ष्मीसोबत श्री हरीची देखील पूजा करावी. 

तुम्ही रोज श्री सूक्तम पठण करू शकत नसाल तरत पौर्णिमेच्या दिवशी किंवा शुक्रवारी करा. हे लक्षात ठेवा की लाल किंवा गुलाबी आसनावर बसूनच श्रीसूक्तम पठण करा. 

पांढरे किंवा गुलाबी वस्र घालूनच पठन करावे. कधीही एकट्याने देवी लक्ष्मीची पूजा करू नये. तुमच्यासोबत घरातील सदस्य असणे देखील आवश्यक आहे.