स्वस्त मार्केटमध्ये घ्या मस्त बांगड्या

स्वस्त मार्केटमध्ये घ्या मस्त बांगड्या

लग्न समारंभ असो की कुठलेही फंक्शन त्यात आवर्जून मॅचिंग बांगड्यांची मागणी होतेच. 

भारतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या बांगड्या बनवल्या आणि विकल्या जातात. 

अशाच बांगड्यांची मोठी बाजारपेठ नागपुरातील हंसापुरी भागात आहे.

या बांगड्यांची डिझाईन, रंगसंगती, बांगड्या तयार होण्याच्या शैली यात भिन्नता आढळते. 

सोन्या-चांदीच्या दागिन्यांची रेलचेल असतानाच या बांगड्याची मागणी आजही मोठ्या प्रमाणावर असते. 

हंसापुरी बाजारपेठेत 6 रुपये डझन पासून ते 6 हजार रुपयांच्या सेटपर्यंत बांगड्या उपलब्ध आहेत. 

महाराष्ट्रात आजही लग्न समारंभात हिरव्या काचेच्या बांगड्याना विशेष मागणी असते. 

केवळ नागपुरातूनच नव्हे तर विदर्भातून लोक येथे बांगड्या खेरदीसाठी येतात.

आमच्याकडे सर्वात महाग 6 हजारापर्यंत दुल्हन सेट आहे, असे बांगडी विक्रते राठोड यांनी सांगितले.