'या' लहान बिया काही दिवसांत वजन करतील कमी!

या लहान बिया म्हणजे, मेथी. हे दिसायला लहान धान्य असले तरी त्याचे गुणधर्म खूप जास्त आहेत. 

मेथीची चव कडू असली तरी ती अनेक आजारांपासून आपल्याला मुक्त करते. मेथीमध्ये खूप औषधी गुणधर्म असतात.

वजनापासून ते त्वचेच्या समस्यांपर्यंत मेथी खूप फायद्याची आहे. चला जाणून घेऊया फायदे. 

मेथीच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होते. यासाठी तुम्ही मेथी किंवा त्याची पावडर भाज्यांसोबत किंवा पाण्यासोबत खाऊ शकता.

वजन कमी करायचे असेल तर मेथी खाणे सुरू करा. मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर ते चावून खा. यामुळे तुमचे वजन हळूहळू कमी होऊ लागेल.

मेथीचे दाणे त्वचा उजळण्यास मदत करतात. हळदीमध्ये मेथीची पाने किंवा दाणे मिसळून पेस्ट तयार करा आणि दर चार-पाच दिवसांनी चेहऱ्यावर लावा. याने चेहऱ्यावरील डाग कमी होतील.

मेथीच्या दाण्यांचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. पचनक्रिया मजबूत होऊन बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

मासिक पाळीदरम्यान महिलांना होणाऱ्या समस्यांवरही मेथीचे दाणे रामबाण उपाय आहेत. कोणत्याही वयोगटातील स्त्रिया याचे सेवन करू शकतात. 

मेथीमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे याच्या सेवनाने शारीरिक कमजोरीही दूर होते आणि मेथीमुळे शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते.