लतादीदींचा जबरा फॅन !

लतादीदींचा जबरा फॅन !

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. 

वर्धा जिल्ह्यातील आर्वी या ठिकाणी लतादीदींचा असाच एक जगावेगळा चाहता आहे.

राजीव देशमुख असं या चाहत्याचं नाव असून त्यांनी थेट घरातच लतादीदींचं मंदिर बांधलं.

देशमुख यांच्या घरात रोज स्वरदेवतेच्या रुपात लतादीदींची पूजा केली जाते.

वयाच्या तेराव्या वर्षापासूनच देशमुख यांना लतादीदींच्या गाण्यांचा छंद लागला. 

घरातील भिंतींवरही लतादीदींचे फोटो असून देशमुख यांच्या भेटीचाही एक फोटो यात आहे.

देशमुख यांनी स्वत:च्या लग्नाच्या पत्रिकेत देखील गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा फोटो लावला होता.

लतादीदींवर तयार केलेल्या गीताला देशमुख यांनी स्वत:च्या आवाजात रेकॉर्ड केलंय. 

राजीव यांच्या पत्नी शुभांगी यांनी लतादीदींचे सरस्वती देवीच्या रुपात पोस्टर तयार केले आहे. 

संगीत क्षेत्रातील दुर्मिळ खजिना!