देवघरात कोणते देव असावेत? 

देवघर ही घरातील महत्त्वाची जागा आहे. प्रत्येकाच्या घरात देवघर असते.

देवघरात देवांची संख्या किती असावी? याची माहिती पुण्यातले ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिलीय.

देवघरात पांडुरंग, बाळकृष्‍ण, किंवा श्रीराम यापैकी एकच मूर्ती असावी.

देवी स्वरुप म्हणून महालक्ष्मी, दुर्गा, अन्नपूर्णा यांच्यापैकी एक मूर्ती असावी.

देवपूजेत पंचायतनामध्येमध्ये गणपती, देवी, विष्णू, महादेव, यांची एक एक मूर्ती ठेवावी.

तसेच शंख,घंटा, कुळ धर्मातील कुल देवी देवतांचे टाक देवघरात असावेत.

आपल्या घरात माहेरून येणारी गृहलक्ष्मी ही माहेर वरून बाळकृष्ण व अन्नपूर्णा हॆ दोन देव आणते.

सून आल्यावर तिच्या माहेरच्या या दोन देवाचे स्थान देवघरात पक्के आहे.

काही ठिकाणी पितरांचे टाक बनवले जातात ते टाक देवघरात ठेवू नये, अशी माहिती जोशी यांनी दिली.

शनीची साथ असल्यानं दिवाळीआधीच या राशी होणार मालामाल