WWE: अंडरटेकरची संपत्ती ऐकून तुम्हाला धक्का बसेल

WWE स्टार अंडरटेकर 2020 मध्ये अधिकृतपणे निवृत्त झाला आहे.

पण, तरीही त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. डेडमॅन नावानं ओळखल्या जाणाऱ्या या 58 वर्षीय रेसलरला तीन बायकांपासून चार मुले आहेत आणि अंडरटेकरचे खरे नाव मार्क विलियम केल्वे असं आहे.

6 फूट 10 इंच उंच आणि 140 किलो वजनाचा अंडरटेकर अमेरिकेतील ऑस्टिन, टेक्सासमध्ये राहतो.

त्यानं सुमारे तीन दशकं WWE आपलं वर्चस्व गाजवलं होतं, अंडरटेकरला मात देणं कोणत्याही रेसलरसाठी सोपं काम नव्हतं.

WWE मधील प्रसिद्धीसोबतच अंडरटेकरने भरपूर कमाई केली. त्याची एकूण संपत्ती जवळपास 17 दशलक्ष डॉलर्स (म्हणजे 1 अब्ज 40 कोटी रुपये) असल्याचा अंदाज आहे.

निवृत्तीनंतर अंडरटेकरने WWE सोबत लिजेंड्स करारावर स्वाक्षरी केलीय. या करारामुळे त्याला दरवर्षी WWE कडून 2.5 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 21 कोटी रुपये मिळतात.

त्याचा व्यावसायिक भागीदार स्कॉट एव्होनहार्टसह, त्याने 2006 मध्ये लव्हलँड, कोलोरॅडो येथे $2.4 दशलक्षमध्ये एक मालमत्ता खरेदी केली. आता या मालमत्तेची किंमत 3.96 दशलक्ष डॉलर्स झाली आहे.

याशिवाय त्यानं अवनहार्टसोबत रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ते मालमत्ता खरेदी करतात आणि नंतर वाढीव नफ्यात विकतात.

अंडरटेकरकडे बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, कॅडिलॅक एटीएस, जीप रॅंगलर रुबिकॉन आणि वेगवेगळ्या मॉडेल्सच्या 4 हार्ले डेव्हिडसन बाइक्स यांसारखी अनेक महागडी वाहने देखील आहेत. अंडरटेकरकडे एकूण 16 कार आहेत.

अंडरटेकरने तशी 1987 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. पण, 1990 मध्ये सर्व्हायव्हर सिरीजमध्ये तो अंडरटेकर नावानं WWE मध्ये आला.

WWE च्या सर्वात मोठ्या इव्हेंट रेसलमेनियामध्ये त्याने सलग 21 सामने जिंकले आहेत.

अंडरटेकर हा 4 वेळा WWE चॅम्पियन, 3 वेळा वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन, एकदा हार्डकोर चॅम्पियन, 6 वेळा WWE वर्ल्ड टॅग टीम चॅम्पियन आणि एकदा WCW टॅग टीम चॅम्पियन बनला होता.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही