पान शेतीतून गाव झालं मालामाल!

आजकाल शेती करताना शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे शेती करताना बऱ्याच वेळा घातलेला खर्चही निघत नाही, अशी अनेक शेतकऱ्यांची व्यथा असते.

पण या सर्व समस्येवर सांगली जिल्ह्यातील एका गावानं फार वर्षांपूर्वी एक उपाय शोधला आहे.

सांगली जिल्ह्यातील बेडग येथे पिढ्यानपिढ्या पानमळ्यांची शेती केली जातेय.

खाऊच्या पानांची शेती करणारा शेतकरी समाधानी असून लखपती झाल्याचे दुर्मिळ चित्र गावात दिसते.

भारतात खाऊच्या पानांना प्रचंड मागणी असते. एकतर खाण्यासाठी त्याचा देशभर वापर होतोच, पण त्याचबरोबर खाऊच्या पानांना धार्मिक महत्त्व ही आहे.

भारतातील कोणताही धार्मिक विधी खाऊच्या पानाशिवाय संपन्न होत नाही.

खाऊच्या पानांच्या शेतीचे महत्त्व सांगली जिल्ह्यातील बेडग गावच्या शेतकऱ्यांनी आधीच ओळखले होते.

म्हणून या गावात बहुसंख्य शेतकरी हे खाऊच्या पानमळ्यांची शेती करतात.