सर्वपित्री अमावस्येला करा हे काम, घरात राहते सुख-शांती

पितृ पक्षात सर्वपित्री अमावस्येला विशेष महत्त्व आहे.

भाद्रपद महिन्यातील अमावास्येला पितृ विसर्जन केले जाते .

पितृ पक्षाच्या 15 दिवसात पिंडदान करता आलं नाही तर अमावस्येला पिंडदान करू शकता.

ज्यांना पूर्वजांची मृत्यु तारीख माहीत नाही तेही अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करू शकतात.

अकाली मृत्यू झालेल्यांचे श्राद्धही या अमावस्येला केले जाते.

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.

आपल्या पूर्वजांचे ध्यान करा आणि पिंपळाच्या झाडाला गंगाजल, तीळ, साखर, तांदूळ आणि पांढरी फुले अर्पण करा.

तसेच पितरांची पूजा करून चुकीसाठी त्यांची क्षमा मागावी.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही