मोबाईल हरवला, चोरीला गेला  याची माहिती  सर्वात आधी  पोलिसात द्या.  FIR ची एक प्रत तुमच्याकडे ठेवा.

यानंतर तुमच्या  नेटवर्क  प्रोव्हायडरला  डुप्लिकेट  सिम कार्ड  जारी करण्यास  सांगा.

ceir.gov.in/ Request/ CeirUser BlockRequest Direct.jsp  या लिंकवर  IMEI ब्लॉक  करण्याची  विनंती करा.

इथं तुम्हाला  पोलीस रिपोर्ट  आणि  इतर महत्त्वाची कागदपत्रं  द्यावी लागतील.

फोन नंबर  टाकताना जो नंबर आधी अॅक्टिव्ह  होता तोच टाका, यावरच  तुम्हाला  OTP मिळेल.

IMEI ब्लॉक  केल्यास  फोन ट्रॅक  होणार नाही.  पण निरुपयोगी  होईल, कुणी त्याचा गैरवापर  करणार नाही.

हरवलेल्या  मोबाईलची तक्रार  नोंदवल्यानंतर  नेटवर्क ऑपरेटर  IMEI क्रमांक  केंद्रीय  डेटाबेससोबत ब्लॅकलिस्ट म्हणून  शेअर करतं.

यामुळे  इतर  ऑपरेटरही  हा नंबर  ब्लॉक करतात. जेणेकरून  फोनमध्ये दुसरं कोणतंही सिम  काम करू  शकत नाही.

अशा परिस्थितीत  सर्व नेटवर्क  प्रोव्हायडर  अलर्ट होतात.  कोणतंही सिम  टाकताच  हा नंबर सापडतो  आणि फोन  ट्रेस केला जातो.

IMEI हे  एकप्रकारे फोनचं  ओळख प्रमाणपत्र.  जो फोन  बॉक्समध्ये,  फोनमधील  अबाउट  फोनमध्ये असतो.