या गावात पुरुषांना नो एन्ट्री, फक्त राहतात महिला

जगात अशी अनेक रहस्य, घटना, गोष्टी आहेत ज्यांच्याविषयी अनेक लोकांना माहिती नाही.

जगात असं एक गाव आहे जिथे फक्त महिलाच राहतात. 

या गावाचं नाव उमोजा आहे. हे गाव केनियामध्ये असून या ठिकाणी स्त्रिया राज्य करतात.

 या गावाची स्थापना सुमारे 30 वर्षांपूर्वी झाली. येथे राहणाऱ्या महिला निर्वासित आहेत.

उमोजा येथील सर्व महिला मसाई समाजाचा भाग मानल्या जाणाऱ्या सांबुरू जमातीचा एक छोटासा भाग आहे.

सांबरु समाजाच्या महिलांवर 1990 च्या दशकात ब्रिटीश सैनिकांनी अत्याचार केला होता. 

अत्याचार झालेल्या महिलांना पतींनी स्विकारलं नाही. त्यानंतर या महिलांनी मिळून हे उमोजा गाव स्थापन केलं.

उमोजा म्हणजे एकता. या गावात महिलांमध्ये एकजूट आहे आणि येथे पुरुषांना प्रवेश नाही. 

आता या गावात सुमारे 40 कुटुंबे राहतात. पारंपरिक मण्यांच्या माळा विकून महिला पैसे कमावतात.