एशियन गेम्समध्ये पहिल्यांदाच भारताची पदकांची शंभरी!

2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे.

या खेळांमध्ये भारताने प्रथमच 100 पदके जिंकली आहेत.

महिला कबड्डीमध्ये भारताने आपले 100 वे पदक जिंकले आहे.

चायनीज तैपेईचा पराभव करून कबड्डीत सुवर्णपदक जिंकले.

या स्पर्धेच्या 14 व्या दिवशी भारताने एकूण 5 पदके जिंकली आहेत.

यामध्ये तिरंदाजीमधील 2 सुवर्णपदक आणि कबड्डीतील 1 सुवर्ण पदकांचा समावेश आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

2018 साली जकार्तामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 70 पदके जिंकली होती.

दिल्ली CWG नंतर भारतानं दुसऱ्यांदा 100 पदकांचा टप्पा पार केला.