बिग बॉसची सर्वात महागडी स्पर्धक ठरली अंकिता!

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे.

बऱ्याच दिवसांपासून अंकिता पडद्यापासून गायब आहे. 

पण लवकरच एका लोकप्रिय शोमध्ये अंकिता सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. 

लवकरच 'बिग बॉस' चा 17 वा सिझन सुरु होणार असून त्यात अंकिता लोखंडे सहभागी होणार आहे. 

अंकिता तिचा नवरा विकी जैनबरोबर या पर्वात सहभागी होणार आहे. 

अंकिता लोखंडे बिग बॉसमधील आतापर्यंतची सर्वात महागडी स्पर्धक असणार आहे असं बोललं जात आहे.

या शोच्या प्रत्येक आठवड्यासाठी अंकिता 10 ते 12 लाख रुपये मानधन घेणार आहे.

 हा आकडा 12 लाखांपेक्षा जास्तही असू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. 

अजून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.