सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची रेशीम शेती!

निवृत्तीनंतर अनेकजण खूप झाले बाबा आता आराम या थाटात घरीच बसतात. परंतु काहीजण सेवानिवृत्तीनंतरही आपल्या कामात सातत्य ठेवत असतात.

जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील हिवरा काबली येथील सेवानिवृत्त शिक्षक सुखदेव बोर्डे हे अशाच प्रकारे वयाच्या पंच्याहत्तरीतही आपल्या शेतीकडे विशेष लक्ष देत आहेत.

सेवाकाळात विद्यार्थ्यांची इमानेइतबारे सेवा केल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर सुखदेव बोर्डे यांनी शेतीलाच आपले सर्वस्व मानले. 

सध्या त्यांनी आपल्या शेतातील एक एकर क्षेत्रात तुती लावून रेशीम शेती सुरू केली आहे.

यातून महिन्याकाठी त्यांना जवळपास अर्धा क्विंटल रेशीमचे उत्पन्न मिळत आहे.

ज्यातून त्यांना 35 ते 40 हजारांचे उत्पादन मिळत आहे.

कमी श्रमात आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारी शेती म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले आहे.

डाळिंब शेतीतून शेतकरी लखपती!