कधीकधी डोकेदुखी असह्य होते आणि तुम्हाला पेनकिलर घ्यायची नसते

अशा परिस्थितीत तुम्ही काही खास घरगुती उपाय करून पाहू शकता.

डोकेदुखीचं एक सामान्य कारण शरीरात पाण्याची कमतरता असू शकतं.

दररोज किमान 8-10 ग्लास पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनचा धोका कमी होतो आणि डोकेदुखी कमी होऊ शकते.

दररोज मेडिटेशन केल्याने तणाव कमी होण्यास आणि डोकेदुखी दूर होण्यास मदत होते.

ड्रायफ्रुट्स मानसिक आरोग्यासाठी चांगले मानले जातात.

अक्रोड, बदाम आणि काजू खाल्ल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होते

कारण त्यात मॅग्नेशियमचं प्रमाण चांगलं असतं, जे डोकेदुखी होऊ देत नाही.

आल्याचा चहा प्यायल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

आल्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेंटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे डोकेदुखी कमी होऊ शकते.

जेव्हा डोकेदुखी असह्य होते तेव्हा विश्रांती घेणं आवश्यक आहे. यामुळे मन शांत होण्यास मदत होईल.