WhatsApp वर कसे वाचायचे डिलीट केलेले मॅसेज, ही आहे ट्रिक

आजच्या काळात जवळपास प्रत्येकजण व्हॉट्सअ‍ॅप वापरतो.

कंपनी यूझर्ससाठी नेहमीच नवनवीन फीचर्स आणते.

यातील एक फीचर म्हणजे 'Delete for Everyone'हे पाठवलेला मॅसेज डिलीट करण्याचं फीचर

अनेकांकडून आपल्याला मॅसेज येतो, पण आपण वाचण्यापूर्वीच डिलीट केला जातो.

अशा वेळी तो मॅसेज काय असेल आणि का डिलीट केला असा प्रश्न अनेकांना पडतो.

हा मॅसेज वाचण्याची एक ट्रिक आहे. ती आपण जाणून घेऊया.

तो मॅसेज वाचण्यासाठी Android यूझर्सना यासाठी थर्ड पार्टी अ‍ॅप्सची मदत घ्यावी लागेल.

WAMR आणि WhatsRemoved+ या प्ले स्टोअरवरील अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही डिलीटेड मॅसेज वाचू शकता.

अ‍ॅप डाउनलोड करुन त्याला Android साठी आवश्यक परमिशन द्या.

‘Delete for Everyone’ म्हणून मार्क केलेले सर्व मॅसेज अ‍ॅपमध्ये सेव्ह केले जातील.