गरोदरपणात 'आल्याचा चहा' घातक? काय होतो परिणाम.. 

अनेकांच्या दिवसाची सुरुवात आल्याचा  चहा पिऊन होते. मात्र या चहाचे काही दुष्परिणामही आहेत. जाणून घ्या गरोदरपणात आल्याचा चहा पिणे शरीरासाठी फायदेशीर की घातक.

अभ्यासात असे दिसून आले आहे की, आल्यासह चहाचे नियमित सेवन केल्यास अचानक रक्तदाब कमी होतो.

उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी आल्याचा चहा चांगला आहे. परंतु कमी रक्तदाब असलेल्यांनी आल्याचा चहा टाळावा.

आल्यामध्ये अँटी-प्लेटलेट गुणधर्म असतात, जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील रक्त कमी होऊ शकते.

आले खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात. परंतु बऱ्याच बाबतीत उलट देखील होऊ शकते.

आल्याचा चहा जास्त प्रमाणात प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते, असे अभ्यासातून दिसून आले आहे.

गरोदरपणात आल्याच्या चहाचे वारंवार सेवन केल्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. गर्भवती महिलांनी दररोज 150 मिलीग्रामपेक्षा जास्त आले खाऊ नये.