एक एकर शेती आणि शेतकरी लखपती

एक एकर शेती आणि शेतकरी लखपती

काही शेतकरी आपल्या प्रयोगशीलतेतून चांगलं उत्पन्न मिळवत असतात. 

जालन्यातील शेतकरी वांग्याच्या शेतीतून चार महिन्यात लखपती झाला आहे. 

अंबड तालुक्यातील कर्जतच्या रामेश्वर शेंडगे यांनी एक एकर शेतीत ही किमया केलीय. 

शेंडगे हे  पारंपरिक शेतीला फाटा देत आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात. 

पारंपरिक शेतीत फायदा होत नसल्याने शेंडगे यांनी एक एकर शेतात वांगी लावली. 

त्यासाठी लागणारी वांग्याची रोपं घरीच तयार केल्यानं खर्चाची बचत झाली. 

संपूर्ण कुटुंबाची साथ आणि चांगल्या दर्जाची वांगी असल्याने चांगला नफा मिळत आहे.

चार महिन्यांत तीन लाखांचे उत्पन्न मिळाले असून वांग्यांची तोडणी सुरूच आहे.