'हा' आहे जगातील सर्वात महाग ड्रायफ्रूट
चिलगोजा हा जगातील सर्वात महाग ड्रायफ्रूट पैकी एक आहे. याला पाइन नट्स असे ही म्हणतात.
चिलगोजा भारतीय दुकानांमध्ये साधारणपणे 1 हजार ते 4 हजार रुपये किलोने विकला जातो.
या ड्रायफ्रूटमध्ये अनेक पोषकतत्व असून त्यांचे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात.
चिलगोजा हे ड्राय फ्रूट व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहे, जो तुमची त्वचा, केस आणि नखे यांचे आरोग्य सुधारू शकतो.
चिलगोजामध्ये फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असते. जे हाडे मजबूत करण्यास आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांशी संबंधित समस्या दूर करते.
चिलगोजामध्ये कॅडमियम, सेलेनियम आणि व्हिटॅमिन ई सारखे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स देखील असतात.
या पोषक तत्त्वांमुळे रोगांशी लढण्यास मदत मिळते.
चिलगोजाचे सेवन मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते, कारण त्यात धोकादायकरित्या उच्च ग्लायसेमिक इंडेक्स नसतो.
तेव्हा चिलगोजामुळे रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत होते.
चिलगोजा वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात, कारण ते प्रथिने आणि लोहाचे समृद्ध स्त्रोत असून यामुळे फार काळ भूक लागत नाही.