छोट्या वेलचीची चव आणि सुगंध जवळपास सगळ्यांनाच आवडतो
मिठाई, पुलाव, बिर्याणी आणि हलव्यामध्ये याचा सर्रास वापर केला जातो.
यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स आढळतात.
वेलचीच्या मदतीने एन्झाईम्सचा स्राव स्टिम्यूलेट होतो. ज्यामुळे पचनास मदत होते
ज्यामुळे पोट फुगणं, गॅस यासारख्या सामान्य पचन समस्यांपासून सुटका मिळते.
जर तुम्ही ते नियमितपणे चघळले तर तोंडाची दुर्गंधी दूर होईल आणि ताजेपणा जाणवेल.
वेलची नैसर्गिक ब्लड थिनर म्हणून काम करते, ज्यामुळे शिरांमध्ये रक्त परिसंचरण सुधारते.
हे खाल्ल्याने रक्ताच्या गुठळ्या होत नाही आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही कमी होतो.
वेलचीचे सेवन केल्याने यूरिनचा फ्लो वाढतो आणि शरीर डिटॉक्सिफाईड होतं.
यामुळे किडनीचे कार्य सुधारण्यास मदत होईल. ज्यामुळे किडनीशी संबंधित आजारांचा धोका दूर होतो.