'या' प्राण्यांचं आयुष्य असतं सर्वात कमी

जगात करोडो प्रकारचे कीटक आणि प्राणी असतात. त्यापैकी काही प्राणी हे वर्षानुवर्षे जगतात पण काही प्राण्यांचे आयुष्य केवळ एका दिवसाचे असते.

तेव्हा जगातील सर्वात कमी काळ जगणाऱ्या प्राणी आणि कीटकांबद्दल जाणून घेऊयात.

डेन्टी मेफ्लाय हा या कीटकाचे आयुष्य केवळ 24 तासांचे असते.

अमेरिकन कॉपर बटरफ्लाय या फुलपाखराचे आयुष्य केवळ दोन आठवड्यांचे असते.

लुना मॉथ या कीटकाचे आयुष्य केवळ 7 दिवसांचे असते.

साइन इव्हियोटा हा जगातील सर्वात लहान माशांपैकी एक असून तो फक्त दोन महिने जगतो.

सिकाडा या कीटकाचे आयुष्य केवळ 2 येत  5 वर्ष असते. परंतु जमिनीवरील त्यांचे आयुष्य केवळ एक महिना असते.

मधमाशीचे आयुष्य केवळ 35 दिवसांचे असते.

पँथर गिरगिटाचे सरासरी आयुर्मान 12 महिने इतकेच असते.

हमिंगबर्ड हा अधिकतर उत्तर आणि मध्य अमेरिकेत आढळत असून तो केवळ तीन ते चार वर्षे जगतो.