Navratri 2023

 नवरात्रीत उपवास करताना टाळा 'या' गोष्टी

नवरात्र हा हिंदू धर्मातील एक मोठा सण आहे. देशात 10 दिवस नवरात्रीची धामधूम असते. 

नवरात्रीचे 9 दिवस उपवास केले जातात. या उपवासामागे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.

उपवास केल्यानं अंतर्मन शुद्ध होतं, भक्ती वाढते आणि देवी दुर्गाकडून आशीर्वाद मिळतात असं म्हणतात. 

नवरात्रीचे उपवास करताना काय करावं आणि काय टाळावं ते पाहूया.

नवरात्रीच्या उपवासात गहू, तांदूळ आणि ओट्स यांसारखे धान्य आवर्जून खाणं टाळा.

या दिवसात मसूर, चणे आणि राजमा सारखे पदार्थ देखील खाल्ले जात नाहीत. 

मासे, अंडी, मांस हे नॉनव्हेज पदार्थ कटाक्षानं त्याग करा. 

अनेक जण नवरात्रीत कांदा-लसूण खाणंही टाळतात. 

पॅकिंग आणि फ्रोजन केलेले पदार्थ या दिवसात खाणं टाळा. कारण त्यात उपवासाला न चालणारे पदार्थ देखील असू शकतात. 

नवरात्रीच्या उपवासात दारू आणि कॅफिनयुक्त शीतपेये देखील पिणे टाळा.