एक महिना दारू सोडल्यास तुमच्या शरीरात काय काय होईल?

दारू आरोग्यासाठी वाईट पण तरी कित्येक लोक दररोज दारू पितात.

काही लोकांना इच्छा असली तरी दारू सोडली तर शरीरावर काय परिणाम होईल, अशी भिती वाटते.  

काही रिसर्चनुसार अचानक दारू सोडली तर एंझायटी वाटते, शरीर थरथरतं, भीती वाटते, चिडचिडेपणा वाढतो, घाम येतो, झोप लागत नाही.

फक्त एक महिन्यासाठी दारू सोडल्याने त्वचा निरोगी, वजन कमी होऊ शकते. चांगली झोप लागू शकते

दारू सोडल्यास भविष्यातील आरोग्याच्या समस्यांचा धोकाही कमी होतो.

सर्वात पहिल्या आठवड्यात तुमच्या झोपेत सुधारणा होईल. चांगली झोप लागेल आणि सकाळीही लवकर वेळेत उठणं सोपं होईल.

दुसऱ्या आठवड्यात तुमच्या त्वचेवर चमक येईल. कारण दारू प्यायल्याने लघवी जास्त होते.

त्वचेतील पाणी शोषून त्याचंही लघवीत रूपांतर होतं. त्यामुळे त्वचा कोरडी होते.

हेल्थलाईनच्या रिसर्चनुसार चार आठवडे किंवा त्याहून अधिक काळ तुम्ही दारू प्यायला नाहीतर तर लिव्हर ठिक होऊ लागतं.

हृदय रोग आणि कॅन्सरचाही धोका कमी होते.