क्रिकेटची सुरुवात १८व्या शतकात झाली. त्याकाळी जे कपडे सहज मिळतात तेच वापरले जायचे.
त्याच वेळी, पांढरे कपडे घालण्याचा निर्णय घेण्यात आला जो पूर्णपणे योग्य होता.
क्रिकेट हा उन्हाळी खेळ आहे, जो खुल्या मैदानात खेळला जातो, अशा वेळी सफेद कपडे चांगला पर्याय आहे.
पांढर्या रंगाचे कपडे निवडले गेले जेणेकरून ते जास्तीत जास्त सूर्यप्रकाश प्रतिबिंबित करतात.
कमी उष्णतेमुळे खेळाडूंचा तणाव कमी झाला.
सफेद कपडे घातल्यामुळे ते कमी थकायचे आणि बेहोशी न होता जास्त वेळ मैदानावर खेळू शकत असे.
यामागे एक कारण असंही होतं की, ब्रिटिशांनी पांढरा रंग हा राजेशाही आणि अभिजातपणाचे प्रतीक मानले.
क्रिकेटला सज्जनांचा खेळ म्हणत म्हणून मग पांढरे कपडे घालण्याची सुरुवात झाली.