मोत्यांचे दागिने फक्त 125 रुपयांत!

दागिने घालून मिरवायला बहुतेक महिलांना आवडतं.

सण लहान असो वा मोठा, कार्यक्रम घरगुती असो किंवा सार्वजनिक त्या दिवशी आपल्या कपड्यांना मॅचिंग दागिने घालण्याची महिलांची इच्छा असते.

त्यामुळे तुम्ही अस्सल मोत्यांचे पारंपारिक दागिने शोधत असाल तर छत्रपती संभाजीनगरमधील एक ठिकाण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

संभाजीनगरमधील औरंगपुरा भागातील सोनचाफा या दुकानामध्ये तुम्हाला मोत्याचे दागिने खरेदी करता येतात.

बुगडी, चिंचपेठ, 11 पेटी चिंचपेठ, बांगड्या, तोडे, पैंजण, मोत्यांचे हार, चोकर, मंगळसूत्र,  असे वेगवेगळे दागिने इथं खरेदी करता येतात.

झुमक्याचा दर दीडशे रुपयांपासून सुरू होऊन 400 ते 500 रुपयांपर्यंत मिळतो.

चार बांगड्या, मोत्याचं मंगळसूत्र, मोत्याची बुगडी, आणि मोत्याचा बाजूबंद असा सेटही इथं उपलब्ध असून त्याची किंमत 795 रुपये इतकी आहे,

पुण्यातील ‘या’ आहेत स्वस्तात मस्त 10 हॉटेल्स