गोव्यातील सर्वात भीतीदायक जागा

गोवा हे खूप लोकांचं आवडतं ठिकाण आहे. मात्र गोव्यात अशीही जागा आहे जिथे जायला लोक घाबरतात.

इगोरचेम बांध हे गोव्यातील सर्वात झपाटलेले ठिकाण मानले जाते.

हा एक झपाटलेला रस्ता आहे जो घनदाट जंगलाच्या मध्यभागी आहे.

दिवसाही लोक या ठिकाणी जायला घाबरतात. याठिकाणीची जबरदस्त दहशत आहे. 

तुम्ही दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान रस्त्याने चालत असाल तर एखादा दुष्ट आत्मा तुमच्यावर वावरू शकतो, असं म्हणतात. 

धरणाजवळ अनेक आत्मे भटकत असल्याचं सांगितलं जातं. अनेकांनी येथे विचित्र आवाज आणि किंचाळणंही ऐकलंय.

दोन भाऊ होते आणि दोघांनाही घर आपल्याच नावावर हवं होतं. एके दिवशी दोघांमध्ये रक्तरंजित भांडण झाले आणि एका भावाने दुसऱ्याची हत्या केली, अशी इथली कथा आहे