अंडं इतकं आरोग्यदायी आहे की ते नैसर्गिक मल्टीविटामिन मानलं जातं.

सुपरफूड्सच्या यादीत ते अव्वल आहे. अंडी हे व्हिटॅमिन ए चा खजिना आहे.

सर्व 9 अत्यावश्यक अमीनो ऍसिड अंड्यांमध्ये आढळतात जे मानवांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत.

अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, फॉस्फरस, सेलेनियम, कॅल्शियम, जिंक, हेल्दी फॅटसह अनेक आवश्यक घटक अंड्यांमध्ये आढळतात.

मात्र काही लोकांनी हीच अंडी समस्या ठरतात, अशा लोकांनी जास्त अंडी खाणं टाळावं

अपोलो हॉस्पिटल, बेंगळुरूच्या मुख्य क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका रोहतगी यांनी याबद्दल सांगितलं.

जर अंडं मर्यादित प्रमाणात खाल्लं तर ते कोणाचंही नुकसान करत नाही

परंतु ज्यांच्या कुटुंबात कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी त्याचं सेवन कमी करावं.

तसंच ज्या लोकांच्या आहारात प्रथिनांचं प्रमाण जास्त आहे त्यांनी देखील मर्यादित प्रमाणात अंडी खावीत

कारण जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए देखील हानिकारक असू शकतं.