60  रुपयांसाठी  मित्राने मित्राचाच घेतला जीव

गोंदियाच्या दवनीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोदा गावातील ही घटना.

अल्पेश पटेल आणि आकाश लक्ष्मण दानवे दोघं मित्र.

अल्पेशने आकाशाला  60 रु. उधार दिले होते,  ते तो परत मागत होता.

आकाशने पैसे सायंकाळी फोनपेने पाठवतो, असं सांगितलं. पण अल्पेशला विश्वास नव्हता.

दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद इतका वाढला की अल्पेशने आकाशचा गळा आवळला.

आकाश बेशुद्ध होऊन खाली कोसळला.

त्याला लगेच रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

आरोपी अल्पेशला दवनीवाडा पोलिसांनी अटक केली.