वास्तुशास्त्रानुसार या प्राण्यांच्या मूर्ती घरी ठेवणं लकी

गाय: गाय संपत्ती आणि विपुलतेचं प्रतिक मानली जाते. गायीची मूर्ती किंवा प्रतिमा घरी ठेवल्यानं समृद्धी मिळते, असे मानले जाते.

Lucky Cat (Maneki-Neko): लकी मांजर (मानेकी-नेको): डोलणारी मांजर ही जपानी संस्कृतीतील एक लोकप्रिय प्रतीक आहे, ती मालकाच्या जीवनात समृद्धी आणते असे मानले जाते.

Elephant: हत्ती: हत्ती हा शक्ती, शहाणपण आणि भाग्याचं प्रतीक आहे. वरती सोंड केलेल्या हत्तीचा मूर्ती किंवा प्रतिमा घरात ठेवल्यानं सकारात्मक ऊर्जा मिळते, असे मानले जाते.

Fish: मासे: फेंगशुईमध्ये, मासे विशेषत: कोई मासे, विपुलता आणि संपत्तीचे प्रतिक मानतात. माशांचे फोटोही समृद्धी आकर्षित करणारे मानले जातात.

Horse: घोडा: घोड्याची मूर्ती किंवा पेंटिंग यश आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. विशेषत: करिअर आणि व्यवसायात यामुळे लाभ मिळतो.

Tortoise: कासव: कासव हे दीर्घायुष्य आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. घरामध्ये कासवाची मूर्ती ठेवल्यानं सौभाग्य वाढतं, असं मानलं जातं.

Cricket: किटकिट करणारा किडा: काही संस्कृतींमध्ये, किटकिट करणारा किडा लकी मानला जातो. त्याचा सकारात्मकतेशी संबंध आहे.

Ladybug: लेडीबग: अनेक संस्कृतींमध्ये लेडीबग नशिबवान मानला जातो. असे मानले जाते की, लेडीबग तुमच्या घरी आला तर तो चांगला संकेत मानला जातो.

Swan: हंस हा शुद्धता आणि सौंदर्याचे प्रतिक मानला जातो. अतिशय मोहक दिसणारे हंस सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, असे मानले जाते.

Owl: घुबड : भारतीय संस्कृतीत घुबड हे बुद्धीमत्तेचे प्रतीक मानले जाते. घुबडाची मूर्ती/फोटो घरी ठेवल्यानं ज्ञान आणि सौभाग्य वाढते, असे मानले जाते.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही