भारतात इथं मुस्लीम परिवार बनवतो जगातला सर्वात मोठा रावण

राजस्थानच्या कोटातील रावण हा सांप्रदायिक एकतेचे उदाहरण असल्याचे म्हटले जाते.

येथे मुस्लीम लोक रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे पुतळे तयार करतात.

कोटामधील काही मुस्लीम कुटुंबे अनेक वर्षांपासून दसऱ्याला रावण बनवतात.

पिढ्यानपिढ्या ते हे काम करत आले आहेत.

जरिश अहमद यांची तिसरी पिढी आश मोहम्मद यंदा कोटाचा रावण बनवत आहेत.

यापूर्वी 2019 मध्ये कोटा येथे 101 फुटांचा सर्वात मोठा रावण तयार करण्यात आला होता.

यावेळी रावण 75 फूट उंच असेल आणि मेघनादचा विशाल पुतळा 55.55 फूट उंच असेल.

विजया दशमीला लाखो लोकांच्या उपस्थित या रावणाचे दहन होईल.

राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात सर्वात खास दसरा साजरा केला जातो.