आता चेहराही फ्रेश करेल कॉफी

आता चेहराही फ्रेश करेल कॉफी

अनेकांची सकाळ गरमागरम चहासोबत होत असली तरी कॉफीचे चाहतेही कमी नाहीत. 

कामाचा कंटाळा आला की मूड फ्रेश होण्यासाठी अनेकांची पसंती कॉफीला असते. 

याच कॉफीचे फेसपॅक बनवून चेहराही तजेलदार करू शकता, असं ब्युटिशियन प्रीती खडसे सांगतात. 

1 चमचा कॉफी,1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध या तिन्ही वस्तू एकत्र करून अप्लाय करा. 

1 चमचा कॉफी, 1 लिंबाचा रस, 1 चमचा बेसन आणि गरज वाटल्यास त्यात थोडा मध ऍड करू शकता. 

1 चमचा कॉफी, 1 चमचा साखर आणि 1 चमचा लिंबूचा रस एकत्र करून त्वचेवर स्क्रब करून लावा. 

1 चमचा कॉफी, 1 ते 2 चमचे गाईचं कच्चं दूध, 1 चमचा बेसन आणि मध एकत्रित करून चेहऱ्यावर लावू शकता.

1 ते दीड चमचा कॉफी, 1 ते 2 चमचे गाईचं कच्चं दूध, एक चमचा कोकोनट ऑइल, बेसन एकत्रित लावावे. 

सध्याच्या सण उत्सवाच्या काळात चेहरा एकदम फ्रेश ठेवण्यासाठी हे फेसपॅक वापरता येतील.