कधीच रिलीज झाले नाहीत किंग खानचे हे सिनेमे!

कधीच रिलीज झाले नाहीत किंग खानचे हे सिनेमे!

शाहरुख खान आता बॉक्स ऑफिसचा देखील किंग झाला आहे.

शाहरुख खान आजपर्यंत 90 हून अधिक चित्रपटात काम केलं आहे.

पण शाहरुख खानच्या कारकिर्दीत असे काही चित्रपट आहेत जे पूर्ण तयार झाले पण कधीच  रिलीज झाले नाहीत.

यामध्ये केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड चित्रपटांचाही समावेश आहे.

रक्षक नावाच्या चित्रपटाची शूटिंग 2001 मध्ये सुरू झाली. पण काही अज्ञात कारणांमुळे हा चित्रपट बंद पडला.

अहमक या नावाचा चित्रपट पूर्णपणे तयार होता. पण हा चित्रपट कधीच थिएटरपर्यंत पोहोचू शकला नाही.

2011 मध्ये शाहरुखने 'एक्सट्रीम सिटी' या हॉलिवूड चित्रपटात काम केले. पण हा चित्रपट कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही.

दिग्दर्शक सुभाष घई यांना शिखर हा चित्रपट शाहरुख खान आणि माधुरी दीक्षितसोबत बनवायचा होता. मात्र, हा चित्रपट कधीच पूर्ण होय शकला नाही.

किसी से दिल लगाके देखो या चित्रपटाचे शूटिंग अर्धे झाले होते. मात्र काही कारणांमुळे शूटिंग थांबवण्यात आल्याने चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही.