फक्त 250 रुपयांना ट्रेडिंग जयपुरी कुर्ती; ठिकाण पाहा 

शॉपिंग हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक महिलांना स्ट्रीट शॉपिंग करायला आवडते.

त्यात नवनवीन ट्रेडिंग आणि फॅशनेबल कपड्यांची खरेदी महिला या मोठ्या प्रमाणात करतात.

त्यामुळे विविध प्रकारचे ट्रेडिंग कपडे स्वस्तात कुठे मिळतील याचा शोध महिला घेत असतात.

तुम्ही अश्याच कपड्यांच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला जयपुरी कुर्तीज मुंबईत कुठे मिळतील याबद्दल माहिती सांगणार आहोत.

मुंबईतील दादरच्या एनसी रोड परिसरात हे जयपुरी कॉटन कुर्तीचे दुकान आहे.

हुसेन अली चौकीदार हे गेले 21 वर्षांपासून या ठिकाणी महिलांचे ड्रेस विकत आहेत.

ट्रेंडिंगमध्ये असलेल्या जयपुरी कॉटन कुर्तीचे वेगवेगळे पॅटर्न फक्त 250 रुपये या किमतीत या ठिकाणी उपलब्ध आहेत.

ब्लॉक प्रिंट कुर्ती, साईड नॉट, स्लिवलेस, स्ट्रॅप असे विविध पॅटर्न जयपुरीमध्ये या ठिकाणी मिळतील.

अगदी कमी किंमतीत करा लॅपटॉप खरेदी!